Voter List Row: 'नुसती चौकशी पुरेशी नाही, सर्व मतदार याद्या तपासा',Sandeep Deshpande यांची मागणी

Continues below advertisement
महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील (Voter Lists) गंभीर त्रुटींचा मुद्दा तापला असून, मनसे (MNS) नेते राज ठाकरे (Raj Thackeray) आणि संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, 'नुसतं एवढं पाऊल उचलून भागणार नाही, सगळ्या मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करणं आवश्यक आहे'. निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले असले तरी, केवळ काही तक्रारींची चौकशी न करता सर्वच मतदार याद्यांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पुन्हा तपासणी करावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली. MNS आणि इतर विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमध्ये दुबार नावे, चुकीचे पत्ते आणि बोगस मतदार असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जोपर्यंत याद्या दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणीही विरोधी पक्षांनी केली आहे. चौकशीचे आदेश हे एक चांगले पाऊल असले तरी ते पुरेसे नसल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola