Voter List Row: 'भाजपला मुंबईत परप्रांतीय महापौर बसवायचा आहे', Sandeep Deshpande यांचा गंभीर आरोप

Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाजप (BJP) आणि नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर मतदार याद्यांमध्ये परप्रांतीयांची नावे घुसवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'भाजपला मुंबईमध्ये परप्रांतीय महापौर बसवायचा आहे आणि त्यामुळे परप्रांतीय मतदार घुसवले जात आहेत', असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला. देशपांडे यांनी दावा केला की मुंबईतील मतदार याद्यांमध्ये ९० टक्के परप्रांतीय नावे आहेत आणि आशिष शेलार यांच्या मतदारसंघात दुबार मतदार असल्याचा पुरावा देखील त्यांनी दिला. दुसरीकडे, मनसेने आगामी BMC निवडणुकीसाठी २२७ पैकी १२५ जागांची यादी तयार केली असून, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू होण्यापूर्वीच हा आढावा घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जागावाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola