Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | ABP Majha

Continues below advertisement
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरात एका वादग्रस्त ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या क्लिपमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या मुलासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी करत एक बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शहरात बंद पुकारण्यात आला आहे. 'जो कोणी भ्रष्ट कडूंच्या मुलाला... त्याला तीन लाखांचे बक्षीस देण्यात येईल,' असे या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. या क्लिपची सत्यता अद्याप पटलेली नसली तरी, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याच्या आरोपांवरून मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला असून, या कटाच्या चौकशीच्या मागणीसाठी शिरूर कासारमध्ये बंद पाळण्यात येत आहे. प्रशासनाने या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola