Avinash Jadhav : शिंदेंना नागोबा फटाका, उद्धव ठाकरेंना अविनाश जाधव कोणता फटका देणार?
Continues below advertisement
एबीपी माझाच्या 'राजकीय आतशबाजी' या विशेष कार्यक्रमात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी विविध राजकीय नेत्यांना फटाक्यांची उपमा दिली आहे. यात त्यांनी सर्वात स्फोटक टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 'महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांनी शिवसेनेसारखा एक मोठा बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष फोडला आणि आहित्या वेळावर नागोबासारखे ते बसलेले आहेत,' असं म्हणत जाधव यांनी शिंदेंना 'नागोबा' फटाक्याची उपमा दिली. यासोबतच त्यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांना निरुपद्रवी 'बटरफ्लाय' फटाका, तर अनेक अडचणींनंतरही पक्ष सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरे यांना 'मोठी लढ' या मोठ्या फटाक्याची उपमा देत त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राला भविष्यात मार्ग दाखवणारे 'बाहुबली' रॉकेट असल्याचेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement