Election Irregularities | MNS ची Election Commissioner भेटीची तयारी, Raj Thackeray च्या आदेशानंतर शिष्टमंडळ
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणुकीत झालेल्या कथित गैरप्रकाराच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते. आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या भेटीसाठी पोहोचत आहे. मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा विविध प्रश्नांसंदर्भात ही भेट होणार आहे. मनसे नेते शिरीष सावंत, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर आणि राजू पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. या भेटीमागे निवडणुकीतील कथित गैरप्रकारांवर चर्चा करणे हा देखील एक महत्त्वाचा उद्देश आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक आयोगासमोर हे मुद्दे मांडून त्यावर तोडगा काढण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.