Raj Thackeray MNS : नेस्को सेंटरमध्ये मनसेचा पदाधिकारी मेळावा; मतदार याद्यांमधील घोळाबाबत चर्चा?

Continues below advertisement
मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये (Nesco Center) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित केला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. 'मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून यात पद्धतशीरपणे घोळ घातला जात आहे', असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे मतदार यादी प्रमुखांना मार्गदर्शन करणार असून, याद्यांमधील त्रुटींवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्याची शक्यता आहे. मनसेकडून या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे 정ुक तक्रार केली जाणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या मेळाव्यातून मनसेने आगामी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे संकेत दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola