हिंदुंवरील हल्ल्याची निषेध रॅली, सकल हिंदू समाजाच्या मोर्चात मनसे, भाजप आणि शिवसेना नेत्यांचा सहभाग
Continues below advertisement
देशभरात हिंदुंवर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज राज्यात ठिकठिकाणी जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलानं या मोर्चांचं आयोजन केलं होतं. औरंगाबाद, जळगाव, परभणी आदी ठिकाणी ही रॅली काढण्यात आली. औरंगाबाद शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला. शहरातील पैठण गेट येथून मोर्चाला सुरुवात होऊन औरंगपुरा इथं मोर्चाचं रुपांतर सभेत झाले. या मोर्चामध्ये भाजप, शिवसेना, मनसे असे सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते. देशभरात जिहाद वाढत असल्याचा आरोप या सभेतील वक्त्यांनी केला. या मोर्चांमध्ये महिला आणि तरुणही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
Continues below advertisement