Mumbai Satyacha Morcha : मतदार यादीत प्रचंड घोळ, निवडणुका घेऊ नका; मनसेची मागणी

Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि महाविकास आघाडीने (MVA) मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या मोर्चात मतदार याद्यांमधील गंभीर त्रुटींचा मुद्दा उचलून धरला. मनसे कार्यकर्त्यांनी 'मतदार याद्या जोपर्यंत सुव्यवस्थित होत नाहीये, तोपर्यंत निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत', अशी आक्रमक भूमिका घेतली. या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मतदार यादीत प्रचंड घोटाळा झाल्याचा आरोप केला. यामध्ये मृत व्यक्तींची नावे असणे, एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंद असणे, एकाच घरावर ५०० लोकांची नावे असणे आणि वडिलांचे वय ४० तर मुलाचे वय ६२ वर्षे अशा विचित्र चुका असल्याचा दावा आंदोलकांनी केला. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चर्चगेट येथे जमून निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola