Border Dispute: 'महाराष्ट्र पोलिसांची कर्नाटकशी हातमिळवणी झालीये का?'; शिंदे सरकारवर शिवसैनिक संतप्त
Continues below advertisement
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे शिवसैनिक बेळगावमध्ये 'काळा दिन' पाळण्यासाठी जात असताना त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पोलिसांनी रोखले. 'महाराष्ट्र पोलिसांची भूमिका ही मराठी माणसाच्या विरोधातची भूमिका आहे, त्यांची कर्नाटकवाल्यांबरोबर हातमिळवणी झाली का?', असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. कर्नाटक प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत अनेक नेत्यांना कर्नाटक बंदीची नोटीस बजावली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत बेळगावमध्ये जाऊन निषेध नोंदवणारच, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतल्याने सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्याच पोलिसांनी अडवल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement