ECI vs Opposition: निवडणूक आयोगाने भेट नाकारली, मनसे-मविआ नेत्यांचा दिल्लीत ठिय्या
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) शिष्टमंडळासह दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची (ECI) भेट घेण्याचा प्रयत्न केला. 'तुम्ही भाजपसाठी काम करता की देशाच्या लोकशाहीसाठी?' असा थेट सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आयोगाला केला. मतदार यादीतील गोंधळासंदर्भात तक्रार करण्यासाठी गेलेल्या या शिष्टमंडळाला आयोगाने भेट नाकारल्याने नेते संतप्त झाले. यानंतर मनसे आणि मविआच्या नेत्यांनी आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. दिल्लीतील या घडामोडीनंतर, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे मुंबईत परतले असून ते पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना 'शिवतीर्थ' येथे संपूर्ण घटनेची माहिती देतील.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement