Leopard Encounter: अखेर शिरूरमध्ये नरभक्षक बिबट्या ठार, 'Forest Department'च्या टीमवर केला होता प्रतिहल्ला!
Continues below advertisement
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात आले आहे. या कारवाईत वनविभाग (Forest Department) आणि शार्प शूटर्सच्या (Sharpshooters) पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. 'डार्ट मिस झाल्यानंतर सावध झालेल्या बिबट्यानं थेट वनविभागाच्या कर्मचाऱ्यावरच प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला'. रात्री उशिरा ड्रोनच्या (Drone) साहाय्याने शोधमोहीम सुरु असताना बिबट्या दिसला. त्याला डार्ट मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर बिबट्याने पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, शार्प शूटर्सनी तीन राऊंड फायर करून सहा वर्षीय नरभक्षक बिबट्याला ठार केले. ज्या ठिकाणी १३ वर्षीय रोहन बोंबे याचा बळी घेतला होता, तिथून ४०० मीटर अंतरावरच ही कारवाई करण्यात आली. ठार झालेला बिबट्या हाच नरभक्षक असल्याची पुष्टी नमुने आणि ठशांवरून झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement