Mumbai Metro 3: प्रवाशांसाठी खुशखबर! सर्व भुयारी स्थानकांवर Free WiFi, MMRC चा निर्णय

Continues below advertisement
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) मेट्रो ३ (Aqua Line) च्या सर्व भुयारी स्थानकांवर प्रवाशांसाठी मोफत वायफाय (Free Wi-Fi) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 'मेट्रो कनेक्ट ३' या मोबाईल अॅपचा वापर करून डिजिटल तिकीट खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी ही विनामूल्य वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा मेट्रोच्या सर्व स्थानकांच्या कॉन्कोर्स म्हणजेच तिकीट खिडकीच्या मजल्यावर उपलब्ध असेल, ज्यामुळे प्रवाशांना भुयारी स्थानकांमध्ये नेटवर्कच्या समस्येमुळे येणारा तिकीट खरेदीतील अडथळा दूर होईल. अनेक प्रवाशांनी भूमिगत मार्गावर मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. एमएमआरसीने प्रवाशांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola