MLC Election Special Report : उमेदवार बारा; जागा अकरा, कोण बळीचा बकरा?
MLC Election Special Report : उमेदवार बारा; जागा अकरा, कोण बळीचा बकरा? ही सगळी लगबग चाललीय ती दगाफटका टाळण्यासाठी... विधान परिषदेच्या निवडणुकीची... या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीय... आणि मतदान करणाऱ्या आमदारांवर करडी नजरही ठेवलीय... त्यासाठी आपापल्या पक्षांच्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय... कारण विधान परिषदेच्या ११ जागांसाठी उमेदवार उभे आहेत १२... आमदारांच्या मतांची फाटाफूट होऊन नये म्हणून मोठी काळजी घेतली जातेय. त्यातच, शेकापचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेसचे ३-४ आमदार क्रॉस वोटिंग करणार आहेत, असा गौप्यस्फोट केलाय तर त्या आमदारांची व्यवस्था काँग्रेस पक्ष करेल, असं काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल म्हणालेत. विधान परिषदेच्या निवडणुकीला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे, काँग्रेसचे ते चार ते आमदार कोण आणि ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असताना, पराभूत होणारा बारावा उमेदवार नेमका कोण? याची मोठी उत्कंठ सर्वांनाच लागून राहिलीय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा