Special Report : आमदार संजय गायकवाडांवर Non-Cognizable Offense, विरोधकांचा सवाल, पश्चाताप नाही!

Continues below advertisement
आमदार संजय गायकवाड यांच्यावर आकाशवाणी आमदार निवासामध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी तीन दिवसांनी ही कारवाई केली आहे. गायकवाड यांच्यावर कलम ३५२ (अपमानित करणं), कलम ११५(२) (मारहाण करणं) आणि कलम ३ (संगनमत करून मारणं) ही अदखलपात्र कलमं लावण्यात आली आहेत. अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये पोलिसांना थेट अटक करता येत नाही आणि न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय पुढील कारवाई करता येत नाही. हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे मानले जात नाहीत. त्यामुळे ही कारवाई केवळ दिखावा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेनंतरही आमदार गायकवाड यांना कोणताही पश्चाताप झालेला नाही. त्यांनी म्हटले आहे की, "मी म्हणतो ना मी केलेलं आहे, मला पश्चाताप नाहीये. मी मारहाण केलेली आहे पण मी काही जीव घेणी मारहाण केलेली नाही. सौम्य मारहाण माजी आहे त्या कायद्यतिर जो गुन्हा असेल तो त्यानी माझा दाखल करो आय डोंट केअर। अदखलपात्र गुन्हा आहे हा। कॉन्स्टेबल आणि नॉन कॉन्स्टेबल म्हणजे हा जो गुन्हा पडत मुडतो हा नॉन कॉन्स्टेबल मध्ये मुडतो आणि पोलीस स्वतः त्याच्याकडे जाऊन आली ना पोलीस त्यांना जाऊन आली त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत काहीच झालं नाही मला तक्रार करायची नाहीये संपला विषय." या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आता गायकवाड यांच्यावर केवळ तोंडदेखली कारवाई होऊन हे प्रकरण शांत होणार की कठोर कारवाई केली जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola