Sangram Jagtap Ahilyanagar : आमदार जगताप यांच्या विधानानंतर नवा वाद, दुकानांवर भगवे झेंडे

Continues below advertisement
अहिल्यानगरचे (Ahilyanagar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी दिवाळीत धर्म पाहून खरेदी करण्याच्या केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद पेटला आहे. 'हिंदूंवरती ज्याप्रकारे गोष्टी लादल्या जातात, त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही प्रत्येक हिंदू दुकानदाराच्या दुकानावरती भगवा पताका लावत आहोत', असे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर जगताप यांना त्यांच्या पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, अहिल्यानगरमध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांनी प्रतिक्रिया म्हणून हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवर भगवे झेंडे लावल्याने शहरातील बाजारपेठा भगव्या झाल्या आहेत. या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola