Amravati : आमदार रवी राणांकडून कोरोना नियमांना हरताळ, ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा हे अनेकदा कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसत असून आज पुन्हा एकदा सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत आमदार राणा यांनी अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील रेल्वे भुयारी मार्गाचा कोणाचीही परवानगी न घेता उदघाटन केलं. यावेळी आमदार रवी राणा यांनी शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमवली होती. एकीकडे जिल्ह्यात कोरोना नियमांचं पालन करण्यासाठी प्रशासन विकएंड लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावत असताना लोकप्रतिनिधी कडूनच कोरोना नियमांचं पालन होत नसेल तर सामान्य जनता काय करणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola