Praniti Shinde on ED : ईडी म्हणजे पानतंबाखुचं दुकान झालंय, माझ्या घरी देखील धाड पडू शकते
Continues below advertisement
ईडी म्हणजे पान तंबाखूच्या दुकानासारखे झाले आहे. भाजप सरकारच्या काळात ईडी,सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थांचा वापर हा राजकारणासाठी केला जात आहे. त्यामुळं भाजपच्या विरोधात बोललात तर तुमच्या घरी केंव्हाही ईडीची धाड पडू शकते. तशी ती माझ्या घरीही पडू शकते. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे यांनी केलीय. ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलंय ते लोक आज खुशाल बाहेर फिरतायत आणि निर्दोष लोक जेलमध्ये आहेत, भाजपची लोक केवळ आग लावण्याचं काम करत आहेत अशी घणाघाती टीका देखील त्यांनी यावेळी केली.
Continues below advertisement
Tags :
Narendra Modi BJP ED Enforcement Directorate Solapur Bjp Government Praniti Shinde Praneeti Shinde BJP