Prakash Surve : 'आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे', आमदार प्रकाश सुर्वे यांची मुक्ताफळं

Continues below advertisement
शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सुर्वे यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. 'एकवेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे,' असे धक्कादायक विधान प्रकाश सुर्वे यांनी केले, ज्यात त्यांनी मराठी भाषेची तुलना 'आई'शी आणि उत्तर भारताची 'मावशी'शी केली. या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्व बाजूंनी टीका होऊ लागताच, सुर्वे यांनी 'माझ्याकडून चुकून शब्द निघाला' असे म्हणत हात जोडून मराठी माणसाची माफी मागितली आणि दिलगिरी व्यक्त केली. विरोधकांनी याला मतांसाठीची लाचारी म्हटले आहे. तर, काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत, हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी मराठी भाषेच्या छातीत खंजीर खुपसला जात असल्याचा आरोप केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola