Idris Naikwadi car attack | अजित पवार गटाच्या MLA च्या गाडीवर दगडफेक, मिरजमध्ये घटना

Continues below advertisement
अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकावडी यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची बातमी समोर आली आहे. मिरज तालुक्यातील जांद्रवाडी गावाजवळ ही घटना घडली. आमदार नायकावडी हे मिरज तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री अजितराव गोरपडे हे देखील उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी तोंडाला रुमाल बांधून आमदारांच्या गाडीवर दगडफेक केली. सुदैवाने, दगडफेक झाली त्यावेळी आमदार इद्रिस नायकावडी हे त्या गाडीत नव्हते, अशी माहिती त्यांच्या सुपुत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञातांकडून झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola