ABP News

MLA Hostel Bhumipoojanआमदार निवास पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन,1200 कोटी खर्चून आलिशान निवास बांधणार

Continues below advertisement

नरिमन पॉइंट परिसरातील ‘मनोरा’ आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.  आज याच कामाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आलाय. प्रत्येकी ४० आणि २८ मजल्यांच्या दोन उंच इमारतींसाठी ५.४ वाढीव एफएसआय मंजूर करण्यात आलाय. सुमारे चार वर्षं काम रखडल्यानं या आमदार निवासाच्या प्रकल्पाचा खर्च सुमारे ४०० कोटींनी वाढला आहे. तर सुमारे १२०० कोटी खर्चून विधानसभेच्या २८८ तर विधान परिषदेच्या ७८ अशा एकूण ३६८ आमदारांसाठी एकाच संकुलात निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच मनोरा आमदार निवासातील चारही इमारतींची अवस्था धोकादायक झाली होती. शेवटी या चारही इमारती पाडून त्या जागी नवीन इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram