MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी
Continues below advertisement
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आज पुन्हा विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरुवात होईल. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी पार पडली होती.त्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आज त्यांच्या साक्षीनं सुनावणी सुरु होईल. मागील आठवड्यातील सुनावणीमध्ये २१ जून २०२२ रोजी ठाकरे गटाने बजावलेल्या व्हिपसंदर्भात तसंच २१ जूनला घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाने जो ठराव मांडला होता, त्यासंदर्भात अनेक प्रश्न, उपप्रश्न सुनील प्रभू यांना विचारण्यात आले होते.
Continues below advertisement