MLA Disqualification : 11 डिसेंबरपर्यंत ठाकरे गटाचे वकील घेणाार उलटतपासणी
Continues below advertisement
MLA Disqualification : 11 डिसेंबरपर्यंत ठाकरे गटाचे वकील घेणाार उलटतपासणी आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची आज उलटतपासणी घेतली जातेय. शिवसेनेनं राष्ट्रवादीशी युती करण्यावरून लांडे यांना सवाल विचारले जात आहेत. शिवसेना आणि बाळासाहेबांची विचारधारा राष्ट्रवादीशी युती करण्याची परवानगी देतं का असा सवाल ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. त्यावर हिंदूंच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेनं भाजपशी युती केली असं उत्तर लांडे यांनी दिलं. हिंदुत्ववादी लोकांसह देशाची सेवा करणं योग्य आहे असं उत्तर लांडे यांनी दिलंय. दरम्यान सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंचा मोबाईल वाजला. त्यावर लांडेंनी हसत अध्यक्ष महोदय कोर्टात मोबाईल वाजतो असं म्हटलंय. त्यावर सुनावणीदरम्यान हशा पिकला.
Continues below advertisement