MLA Disqualification Special Report : कोण पात्र, कोण अपात्र?, आमदार अपात्रप्रकरणी परवा फैसला
Continues below advertisement
२२ जून २०२२. महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारी तारीख. याच दिवशी एकनाथ शिंदे १६ आमदारांसह सुरतला रवाना झाले आणि शिवसेनेत मोठं बंड झालं. राजकीय उलथापालथ झाली आणि भाजपसोबत युती करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले. त्यानंतर सुरुवात झाली ती पक्ष आणि चिन्हाच्या वादासह आमदार अपात्रतेच्या प्रकरणाला.. शिंदे आणि ठाकरे गटाने एकमेकांच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी केली.. विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली आणि वर्षभर सुरु असलेल्या या प्रकरणाच्या निकालाला आता अवघे काही तास उरलेत.
Continues below advertisement