MLA Disqualification Cas : व्हिपवरुन दोन्ही गटांच्या वकिलांची सुनावणीदरम्यान खडाजंगी

आमदार अपात्रता प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत सुनील प्रभूंची सलग तिसऱ्या दिवशी उलट तपासणी सुरू आहे. व्हिपबाबत या सुनावणीसाठी तसंच सुप्रीम कोर्टातही खोटी कागदपत्रं सादर केली असा आरोप शिंदे गटाच्या वकिलांनी केला. मात्र संविधानाची शपथ घेत प्रभूंनी हा आरोप फेटाळला. दरम्यान व्हिपबाबतची कागदपत्रं शिंदे गटाला पुन्हा दाखवा असं प्रभू म्हणाले. त्यावर ही त्यांनीच कागदपत्रं तयार केली आहेत जी कोर्टात सादर केली आहेत. मग आज ती त्यांनाच का ओळखता येत नाहीत असा सवाल जेठमलानींनी केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola