MLA Disqualification case:आमदार अपात्रता सुनावणीत सलग 3 दिवस प्रभूंची साक्ष,सुनावणीत नेमकं काय झालं?

Continues below advertisement

MLA Disqualification case : आमदार अपात्रता सुनावणीत सलग 3 दिवस प्रभूंची साक्ष, सुनावणीत नेमकं काय झालं?

आमदार अपात्रताप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत सुनील प्रभूंची सलग तिसऱ्या दिवशी उलट तपासणी झाली. २१ जूनच्या व्हिपचा मेसेज आमदारांना पाठवण्यातच आला नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात आला. ज्या मनोज चौैगुलेंच्या मोबाईलवरून हा मेसेज पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय, तो मोबाईल इथे सादर का झाला नाही, किंवा चौगुलेंना इथे साक्षीदार म्हणून का सादर केलं नाही असा सवाल जेठमलानींनी केलाय. मात्र शिंदे गटाचा हा दावा प्रभूंनी सपशेल फेटाळला. २१ जूनच्या बैठकीत दादा भुसे, संजय राठोड हजर होते असं प्रतिज्ञापत्रात ठाकरे गटाने म्हटलंय. मात्र सुुप्रीम कोर्टातल्या प्रतिज्ञापत्रात गैरहजर असल्याचं म्हटलंय. या परस्पर विरोधी विधानांवरही जेठमलानींनी प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न केला. आता पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram