MLA Disqualification Case :प्रतिज्ञापत्राला अर्थ नाही,फेरसाक्ष प्रत्यक्षात व्हावी- शिंदे गटाचे वकील
MLA Disqualification Case : प्रतिज्ञापत्राला अर्थ नाही, फेरसाक्ष प्रत्यक्षात व्हावी, शिंदे गटाचे वकील ..
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत (MLA Disqualification) आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जातेय. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे प्रभूंची उलटतपासणी घेत आहेत. 2019 च्या निवडणुकीत आपण काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रचारात टीका केली होती का असा सवाल जेठमलानींनी केला. त्यावर आपण आपल्या मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो त्यामुळे तशी वेळ आली नाही असं प्रभू म्हणाले. दरम्यान इंग्रजी याचिकेवरून शिंदे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांना अध्यक्षांनी खडसावलं. व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी तीन वेळा फेटाळूनही आपण ती वारंवार का करत आहात असा सवाल अध्यक्ष नार्वेकरांनी केला.