Solapur Politics : सोलापुरात 'मिशन लोटस'वरून भाजपमध्येच अंतर्गत कलह पेटला

Continues below advertisement
सोलापूर (Solapur) भाजपमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या 'मिशन लोटस'मुळे (Mission Lotus) अंतर्गत वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 'हे गुप्तचर पद्धतीनं आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे,' असा थेट इशारा देशमुख यांनी पक्ष नेतृत्वाला दिला आहे. देशमुख समर्थकांनी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर निदर्शने करत कलंकित नेत्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) आपले नेते भाजपमध्ये जाण्याच्या शक्यतेने कृषिमंत्री दत्ता भरणे (Datta Bharne) यांना परिस्थिती हाताळण्यासाठी सक्रिय केले आहे. या एकूण घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola