Lakshmi Pujan 2025: किती वाजेपर्यंत करता येईल लक्ष्मीपूजन?; पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांची माहिती

Continues below advertisement
दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Pujan) मुहूर्ताबद्दल अनेकांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण (Da. Kru. Soman) यांनी दूर केला आहे. 'मंगळवारी, २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ११ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत लक्ष्मी कुबेर पूजन करायचं आहे आणि तेच शास्त्रसंमत आहे,' असे दा. कृ. सोमण यांनी म्हटले आहे. धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय यांसारख्या धर्मग्रंथांचा संदर्भ देत त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, पूर्व दिवशी प्रदोषव्याप्ती असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा जास्त अमावास्या असेल आणि प्रतिपदेची वृद्धी होत असेल, तर दुसऱ्याच दिवशी लक्ष्मीपूजन करणे शास्त्रानुसार योग्य ठरते. त्यामुळे, यंदा लक्ष्मी आणि कुबेर पूजन मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात करणेच योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola