Solapur Floods: 'देव तारी त्याला कोण मारी', Sina नदीच्या पुरात 70 तास पत्र्यावर अडकली 2 वासरं!

Continues below advertisement
सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यात सीना (Sina) नदीला आलेल्या पुरामुळे एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. यात शेतकरी बाळू मार्कड यांच्या दोन वासरांनी तब्बल ७० तास म्हणजेच तीन दिवस पुराच्या पाण्यात एका पत्र्याच्या शेडवर अडकून काढले. 'देव तारी त्याला कोण मारी' याचीच चर्चा या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात सुरू झाली आहे. पुराचे पाणी वाढू लागल्याने शेतकरी बाळू मार्कड यांनी आपली जनावरं सुरक्षित ठिकाणी सोडली होती, मात्र त्यातील दोन वासरं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ही वासरं वाहात जाऊन एका पत्र्याच्या शेडवर अडकली आणि तिथे तीन दिवस होती. इतक्या मोठ्या पुरातून ही दोन्ही वासरं वाचल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola