Mira Road Marathi Special Report | मराठी भाषेवरून वाद, MNS कार्यकर्त्यांवर गुन्हा, व्यापाऱ्यांचा बंद

मीरा रोडमध्ये मराठी आणि अमराठी भाषिक वादाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मुंबईजवळच्या मीरा रोड येथील जोधपूर स्वीट्स या मिठाईच्या दुकानात मराठी बोलण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला. या वादामुळे MNS कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केली. या घटनेनंतर मीरा रोडमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दुकान मालक बाबुलाल चौधरी यांनी आपली बाजू मांडली. काशीमिरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत MNS च्या सात कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. एका व्यापाऱ्याने सांगितले की, "तुम्ही महाराष्ट्रामध्ये असेल तर मराठी बोलायला पाहिजे. आम्ही मराठी नाही बोलला पाहिजे असे म्हणत नाही. आमच्या शाळेत मराठी शिकवतात." MNS नेते अविनाश जाधवांनी मीरा रोडमधील बंद हा व्यापाऱ्यांचा नसून भारतीय जनता पक्षाचा असल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांनी कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. "भाषेचा अपमान मान्य नाही. मराठी बद्दल सर्व भाषिकांनी सकारात्मकच व्हायला लागेल. शिकून घ्यावं लागेल असं आमचं मत आहे. पण म्हणून अमराठी माणूस की अमराठी बोलणाऱ्याला शोभ देणं हे गैरकृत्य अयोग्य आहे आणि असे कृत्य कायदा सुव्यवस्थेत मान्य नाही. त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे," असे सत्ताधाऱ्यांनी म्हटले आहे. मीरा रोडची घटना आणि त्यावरून मराठी अस्मिता आणि भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वादामुळे मीरा रोडमधील वातावरण तापले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola