Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केले

Continues below advertisement

Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केले

रुग्णालयात बुरखा घालून 21 लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना काशिगांव पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांनी रुग्णालयात चोरी करताना आपली ओळख लपवण्यासाठी बुरखा घालून चोरी केली होती.  चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.   काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधा हॉस्पिटलमधून तिघांनी २१ लाखांची चोरी केली होती. पोलिसांनी रुग्णालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज आणि तांत्रिक कारणावरून चोरट्यांचा माग काढला आणि बिहार आणि यूपीमधून या चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी चोरट्यांकडून 18 लाख रुपये आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे, तर या चोरट्यांनी 3 लाख रुपये खर्च केले आहेत. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram