Hingoli Covid Hospital : हिंगोलीतील कोविड रुग्णालयात साफसफाईसाठी अल्पवयीन मुलं

Continues below advertisement
कोरोना महामरीच्या पश्वाभूमीवर राज्य सरकार तिसऱ्या लाटेत 18 वर्ष वयोगटातील बालकांना खबरदारी घेत असताना हिंगोली येथील शासकीय कोविड रुग्णालयात मात्र अल्पवयीन शाळकरी मुलांनाच कोविड रुग्णालयात साफसफाई कामावर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल हिंगोली येथील ज्या कोविड रुग्णालयाची भेट घेतली व त्या ठिकाणच्या आरोग्य सुविधेची पाहणी केली, त्याच कोविड रुग्णालयातील कोविड रुग्णांचा जैविक कचरा हे शाळकरी मुले उचलताना दिसत होती. ही काम करणारी मुले ही आठव्या व दहाव्या वर्गात शिकणारी शाळकरी मुले असून यांची वये ही जेमतेम 14 ते 15 वर्षे असेल. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram