Coronavirus | केंद्र सरकारकडून मुंबई आणि महाराष्ट्राला सापत्न वागणूक : यशोमती ठाकूर
केंद्र सरकार मुंबई आणि महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जातेय, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केलाय. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत झालेला असताना केंद्र सरकारकडून सातत्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. गेल्या आठवड्यातच केंद्रानं जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमध्येही राज्याला जाणीवपूर्वक डावलल्यांचंही ठाकूरांनी म्हटलंय. शिवाय ,कोरोनाच्या संकटातून आर्थिक राजधानी मुंबई लवकर सावरावी यासाठी केंद्रानं तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणीही ठाकूर यांनी केलीय.