Sanjay Shirsat Controversy : उपोषणकर्त्याला घरी बोलावलं, पालकमंत्री शिरसाट वादाच्या भोवऱ्यात
Continues below advertisement
कन्नड (Kannad) तालुक्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी उपोषण करणारे कार्यकर्ते संदीप सेठी (Sandeep Sethi) यांना पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उपोषणस्थळी न जाता स्वतःच्या घरी बोलावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. 'सिडकोचे (CIDCO) पाच हजार कोटी रुपये खायला तुमच्याकडे वेळ आहे, पण आमचा शेतकरी उपोषण करत असतो, त्याला भेटायला वेळ नाही,' अशा शब्दात विरोधकांनी शिरसाटांवर अहंकारीपणाचा आरोप केला आहे. तब्बल नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेल्या सेठी यांना रुग्णवाहिकेतून संभाजीनगर येथील शिरसाट यांच्या निवासस्थानी नेण्यात आले, जिथे त्यांनी मंत्र्यांच्या हस्ते रस पिऊन उपोषण सोडले. या कृतीमुळे शिरसाट असंवेदनशील असल्याची टीका होत आहे. मात्र, 'उपोषणकर्त्यानेच माझ्या हस्ते उपोषण सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती,' असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले असून, लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement