Sanjay Shirsat : 'सरकारचा पैसा आहे, बापाचं काय जातंय?'; पालकमंत्री शिरसाटांचं वादग्रस्त वक्तव्य

Continues below advertisement
पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रचंड असंवेदनशीलता समोर आली', असे म्हणत त्यांच्या अनेक विधानांवरून आता टीका होत आहे. अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना, 'सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?', असे विधान करून शिरसाट यांनी सरकारी निधीबाबत बेजबाबदार वृत्ती दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला. एवढेच नाही तर, पूर्वीच्या काळात 'आपण भावाला वशिला लावून नोकरी लावली होती', अशी जाहीर कबुलीही त्यांनी दिली आहे, ज्यामुळे नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. यापूर्वी पैशांनी भरलेल्या बॅगच्या व्हायरल व्हिडिओमुळेही ते वादात सापडले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola