एकमेकांच्या पायात पाय घालून हे सरकार पडेल! केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची EXCLUSIVE मुलाखत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पटोले यांना येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. एवढच नाही तर येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत रावसाहेब दानवे बोलत होते.