Forensic Lab | ठाण्यामध्ये मिनी फॉरेन्सिक लॅब सुरू | ABP Majha
ठाण्यामध्ये स्वतंत्र मिनि फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यात आली आहे. न्यायिक आणि तांत्रिक विभागाचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यात आलं.
ठाणे शहर-ग्रामीण भाग, पालघर या भागात दिवसेंदिवस वाढत जाणारे गुन्हे आणि त्यातून जप्त केलेल्या वस्तूंची तात्काळ लॅबमध्ये टेस्ट व्हावी, यासाठी ही मिनि लॅब ठाण्यामध्ये सुरू करण्यात आली आहे.
यामुळे २ महिन्यांमध्ये गुन्ह्यांचा तपास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
राज्यात 8 फॉरेन्सिक लॅब अस्तित्वात असून अतिरिक्त पाच मिनी फॉरेन्सिक लॅबना शासनाने मंजुरी दिली होती. त्यापैकी चौथी लॅब ठाण्यात सुरु करण्यात आली आहे