Milk Tanker Accident : भिवंडी-पारोळ मार्गावर दुधाच्या टँकरचा अपघात, दूध शेतात वाहून लाखोंचे नुकसान
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMilk Tanker Accident : भिवंडी-पारोळ मार्गावर दुधाच्या टँकरचा अपघात, दूध शेतात वाहून लाखोंचे नुकसान
भिवंडी पारोळ राज्य महामार्गावर दुधाने भरलेला टँकर भिवंडीच्या दिशेने येत असताना आमराई खडकी बुद्रुक गावाच्या हद्दीत आला असता रस्ता खचलेला असल्याने झालेल्या अपघातात टँकर नाल्यात कलंडून दूध वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून टँकर चालक किरकोळ जखमी झाला आहे.गुजरात येथून कोनगाव येथील मदर डेअरी च्या कंपनीत हे दूध घेऊन येत असताना हा अपघात झाला आहे.टँकर एका शेताच्या बाजूकडील नाल्यात पलटल्याने टँकरचे बंद केलेले झाकण उचकटल्याने हजारो लिटर दूध शेतात वाहत जावून पूर्ण शेतच दूधमय झाले होते.दरम्यान परिसरातील नागरिकांसह या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांनी दूध घेण्यासाठी घरातील चक्क हंडा,कलशी इतर भांडी घेऊन दूध घेण्यासाठी येत होते.