Mihir Shah Arrest Virar : मुंबई क्राईम ब्रांचकडून मिहीर शाहला विरारमधून बेड्या

Continues below advertisement

रळी हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहिर शाहाला (Mihir Shah) अखर अटक करण्यात आलं आहे. तब्बल दोन दिवसांनंतर मिहिरला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अपघातानंतर फरार झालेल्या मिहिर शहाविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीसही (Look Out Notice) जारी केली होती. मिहिर शाहाला विरारमधून (Virar) अटक करण्यात आली असून त्याच्याबरोबर आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहिर शाहा हा वरळी हिट अँड प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मिहिरबरोबरच पोलिसांनी मिहिरची आई आणि बहिणीलाही ताब्यात घेतलं आहे. गुन्हे शाखेने आरोपीला मदत करणाऱ्या तब्बल 12 लोकांनाही ताब्यात घेतलं आहे. 

मुख्य आरोपी मिहीर हा पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. दारुच्या नशेत  भरधाव BMW कार चालवणाऱ्या मिहीरनं रविवारी म्हणजे सात जूनला सकाळी वरळीत एका दुचाकीला उडवलं अपघातात जखमी नाखवा दाम्पत्याला मदत करण्याऐवजी त्यानं कारखाली सापडलेल्या महिलेला फरफटत नेलं. त्यात कावेरी नाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचे पती यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram