Mhada Lottery : घरं घेण्याची सुवर्णसंधी, April महिन्यात म्हाडाकडून 1200 घरांसाठी सोडत
Continues below advertisement
Mhada Lottery : घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबईजवळ घर खरेदी करण्याची संधी म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील महिन्यात म्हाडाकडून 1200 घरांसाठी सोडत निघणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ही सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे ही घरे मुंबईजवळील शहरांमध्ये असणार आहे. या इमारतींचे बांधकाम खासगी विकासकांकडून करण्यात आले आहे.
Continues below advertisement