Mhada Lottery 2024 : मुंबईच्या पहाडी गोरेगावमध्ये म्हाडा उभारणार 2500 घरं : ABP Majha

Continues below advertisement

 

गोरेगावमध्ये म्हाडा आणखी अडीच हजार घर बांधणार, पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी अडीच हजार घरं बांधण्याचा म्हाडाचा निर्णय.   गोरेगाव, पहाडी येथे २,५०० हून अधिक घरांची निर्मिती केल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार आहे. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर २,५०० घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरे असणार आहेत.

या घरांची निर्मिती दोन टप्प्यांत करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील १,५०० घरांच्या कामासाठी निविदा काढण्याची तयारी मुंबई मंडळाने सुरू केली आहे. पत्राचाळ म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला आपल्या हिश्श्यातील २,७०० घरे सोडतीसाठी विकासकाकडून उपलब्ध होणार होती. मात्र विकासकाने पुनर्विकास अर्धवट सोडल्याने प्रकल्प रखडला. तर दुसरीकडे प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केला. प्रकल्प वादात अडकला आणि शेवटी राज्य सरकारने विकासकाकडून प्रकल्प काढून घेत व म्हाडाकडे सोपवला.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram