MHADA exam paper leak : म्हाडाच्या पेपरफुटीची सीबीआय चौकशीची करा : देवेंद्र फडणवीस ABP Majha
Continues below advertisement
आरोग्य भरती आणि टीईटी परीक्षेच्या घोळानंतर आता म्हाडाच्या भरती परीक्षेत देखील घोळ झालाय. म्हाडाच्या या आठवड्यात होणाऱ्या परीक्षा रातोरात पुढे ढकलण्यात आलीय. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागलाय. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीच्या प्रकरणातील आरोपींकडून म्हाडाच्या परीक्षेतही पेपर फोडला जाणार असल्याची माहिती मिळाली...आणि त्यामुळं परीक्षा अचानक रद्द करावी लागल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. विशेष म्हणजे ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं होतं त्याच कंपनीच्या लोकांनी हा पेपर फोडण्याचं काम केलंय... त्यामुळे एकंदरीतच आता पेपर घेणाऱ्या संस्थेच्या भोवतीचं संशयाचं वर्तुळ निर्माण झालंय.
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या पेपरफुटीबद्दल राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय..
Continues below advertisement