Sharad Pawar Birthday : Ajit Pawar- 'कोट्यावधी तरुणांच्या गळ्यातला ताईत बनून राहण्याची ताकद साहेबांमध्ये'

मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आणि दमदार नेतृत्व म्हणजे शरद पवार... राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८१ वाढदिवस... या वयातही त्यांचा झंझावात कायम आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषीमंत्री असा पल्ला गाठणाऱ्या पवारांचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान अढळ आणि महत्त्वाचं आहे. या वयातही त्यांचा झंझावात कायम आहे..  महाविकास आघाडीचे प्रणेते ठरलेल्या शरद पवारांचं राष्ट्रीय राजकारणातलं स्थान अढळ आहे... शरद पवार नावाचा अध्याय फक्त राजकारणापुरता मर्यादीत नाही.. तर समाजकारण, कला आणि क्रीडा क्षेत्रातलं शरद पवारांचं योगदान अतुलनीय आहे..पवारांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसंच पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत वरळी इथल्या नेहरु सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात पवारांचं औक्षण करण्यात आलं.. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या अॅपचं लॉन्चिंग करण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola