Metro 2A and 7 Updates : मेट्रो सेवांच्या रात्रीच्या वेळांमध्ये होणार बदल, शेवटची मेट्रो 10:30 वाजता
abp majha web team
Updated at:
14 Feb 2023 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMetro 2A and 7 Updates : मेट्रो सेवांच्या रात्रीच्या वेळांमध्ये होणार बदल, शेवटची मेट्रो 10:30 वाजता
मुंबई मेट्रोच्या मेट्रो टू ए आणि मेट्रो सेव्हन या दोन्ही मार्गांवर रात्रीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही मार्गांवर शेवटची मेट्रो आता रात्री दहा वाजून नऊ मिनिटांऐवजी साडेदहा वाजता सोडण्यात येणार आहे. मेट्रो टू ए आणि मेट्रो सेव्हन मार्गांवर शेवटच्या ट्रेनची वेळ रात्री साडेदहा वाजेपर्यंत वाढवण्यासाठी दोन्ही मार्गांवर दोन जादा ट्रेन्स सुरू केल्या जाणार आहेत. ही सेवा उद्यापासून सुरु करून, प्रायोगिक तत्त्वावर दोन महिन्यांसाठी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.