ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रावर गोंधळ, कोणतीही सूचना फलक नाही, 15 तारखेपर्यंत कार्यालय बंद
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या शक्यतेमुळे ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्र १५ जूनपर्यंत बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत असल्याचं बघायला मिळत आहे. पुणे, कल्याण, डोंबिवलीवरुन नागरिक आले आहे. अनेकांना आजसाठी अपाॅइन्टमेंट देण्यात आली होती. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता ठाण्यातील पासपोर्ट केंद्र बंद करण्यात आले आहे. अनेकांना पासपोर्ट रिनिव्हू करायचे आहे तर कोणाला शिक्षणासाठी आणि परदेशात नोकरी करण्यासाठी जायचं आहे.