12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ट्रेनमधून खाली फेकलं,साताऱ्यातील धक्कादायक घटना,जखमी मुलीवर उपचार सुरू
वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस मध्ये अवघ्या बारा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करुन तिला रेल्वेतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना पहाटे घडली. दिल्ली येथे निघालेल्या पती-पत्नी आणि तीन लहान लहान मुलिंसह एक बदली झाल्यामुळे ते दिल्ली येथील घरी जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. महत्वाचे म्हणजे यातील आरोपी हा सैनिक दलात कार्यरत आहे. वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस ही आज पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या हद्दीत आली असताना आरोपीने बारा वर्षाच्या चिमुकलीला झोपलेल्या अवस्थेत उचलून धावत्या रेल्वेतील बाथरुममध्ये नेले.