Devendra Fadnavis Meeting : देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिल्हा निवडणूक प्रभारींची बैठक
Continues below advertisement
राज्याच्या प्रशासनात मोठ्या पदोन्नतीची घोषणा झाली आहे, तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. ‘महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून इतक्या मोठ्या प्रमाणावर नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी पदांवर पदोन्नती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.’ या पदोन्नतीमुळे १७० तहसीलदार आता उपजिल्हाधिकारी होतील, तर ८५ नायब तहसीलदारांना तहसीलदार म्हणून बढती मिळणार आहे. याशिवाय १०० जणांची नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती केली जाणार असून गेल्या सात-आठ वर्षांपासून रखडलेला हा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपच्या (BJP) जिल्हा निवडणूक प्रभारींची बैठक होणार आहे. यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती, नियोजनाची जबाबदारी आणि प्रक्रियेची निश्चिती केली जाईल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement