Congress Election: 'आम्ही स्वतंत्र लढणार', काँग्रेसचा स्वबळाचा नारा, वडेट्टीवारांची मोठी घोषणा

Continues below advertisement
आगामी नाशिक (Nashik) आणि मुंबई (Mumbai) महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 'आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलंय की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही,' असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. एकीकडे मुंबईत स्वबळाचा नारा दिला जात असताना, दुसरीकडे नाशिकमध्ये स्थानिक काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (MNS) महाविकास आघाडीच्या (MVA) बॅनरखाली निवडणूक लढण्याची घोषणा केली. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय फेटाळून लावल्याने नाशिकमधील आघाडीच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मुंबई आणि नाशिकच्या धोरणांवरून मतभेद असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola