Mega Business Hub: BKC पेक्षाही आधुनिक हब, नवी मुंबई, कल्याण, पनवेलचा चेहरामोहरा बदलणार!
Continues below advertisement
नवी मुंबई (Navi Mumbai), कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) आणि पनवेलच्या (Panvel) वेशीवर, जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीच्या (JICA) मदतीने मुंबईच्या BKC पेक्षाही मोठे आणि आधुनिक बिझनेस हब (Business Hub) विकसित होणार आहे. या नव्या बिझनेस हबसाठी ठाणे महापालिकेची (Thane Municipal Corporation) नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे. हे केंद्र ठाणे आणि KDMC हद्दीतील दातिवली, मातोर्डी, बेतवडे, आगासन, आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, पंचानंद आणि काटई या गावांच्या परिसरात तब्बल तेराशे एकर जागेवर उभारले जाणार आहे. या विशाल प्रकल्पामुळे चारही शहरांच्या विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. निळजे ग्रोथ सेंटर, ऐरोली-काटई मार्ग आणि कल्याण-तळोजा मेट्रो लाईन यांसारखे प्रकल्प या हबसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. तसेच, हे हब सिडकोच्या (CIDCO) खारघर येथील प्रस्तावित कॉर्पोरेट पार्कला जोडले जाणार असल्याने या संपूर्ण परिसराचा कायापालट निश्चित मानला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement