Uddhav Thackeray Marahtwadda Daura : 7 आणि 9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर
Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार असून, पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्यासाठी एकत्र येत नवी राजकीय समीकरणं मांडली आहेत. 'शिंदेंचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्यासाठी घारे आणि सावंत एकत्र आलेले आहेत,' असे या युतीमागील प्रमुख कारण सांगितले जात आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात अखेर तोडगा निघाला असून, पवार अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर, काँग्रेसचे नेते समीर सकपाळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने रोह्याच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली की नाही, याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौरा करणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement